जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात सतत चकमकी होत असतात. कुपवाडा, राजौरी, नौशेरा या सीमेजवळलील भागात दहशतवादी सतत नापाक कारवाया करून आपल्या देशाला त्रास देत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. आज सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार केले आहे. दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
गुरुवारी सकाळी तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना दहशतवाद्यांचा एक गट भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. लष्कराने त्यांना आव्हान दिले आणि परत जाण्याचा इशारा दिला. मात्र दहशतवाद्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भारतीय सीमेकडे सरकतच राहिले. दरम्यान लष्कराने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. बाकीचे पळून गेले. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढले असून, सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.