Sunil Chettri Retirement : नुकतीच क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार फुटबॉलपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुलबॉलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. सुनीले छेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सुनील छेत्रीने आज (16 मे) सकाळी एका व्हिडीओद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने स्पष्ट केले की, “कुवेतविरूद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा माझा देशासाठीचा शेवटचा सामना असले. हा सामना 6 जून रोजी होणार आहे. तसेच आपण क्लब बेंगळुरू एफसीकडून खेळत राहू”, असे त्याने सांगितले.
सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने देशासाठी 150 सामन्यात 94 गोल केले आहेत. सध्या तो आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. निवृत्तीची घोषणा करताना छेत्रीने आपल्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि म्हटले की, मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते.
https://x.com/chetrisunil11/status/1790953336901976541
पुढे छेत्रीने 19 वर्षांच्या कारकिर्दीसाठी त्याचे प्रशिक्षक, कर्णधार, वरिष्ठ, स्टाफ आणि युवा संघसहकारी यांचे आभार मानले. “ज्यांना वाटत होतं की मी निवृत्त व्हावं आता त्यांना आनंद होईल”, असंही छेत्री म्हणाला.