Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येत्या 8 जून रोजी बीडमध्ये सभा पार पडणार होती. मात्र, आता अचानक त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगेंची ही सभा तब्बल 900 एक्करांवर होणार होती, त्यामुळे त्यांच्या सभेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. पण आता त्यांची ही मोठी सभा रद्द करण्यात आली आहे.
8 जून रोज मनोज जरांगेंची नारायणगडावर सभा होणार होती. त्यांच्या सभेला तब्बल सहा कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता ही सभा रद्द करण्यात आली आहे.
सध्या बीडमध्ये मोठा दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे सभेसाठी येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये म्हणून ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जरांगेंची ही सभा आता जूननंतर होणार असून त्यासाठीची बैठक लवकरच होणार आहे.