पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला “भ्याड आणि घृणास्पद कृत्य” म्हंटले तसेच मोदींनी स्लोव्हाकच्या पंतप्रधानांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. .
स्लोव्हाकियाचे चार वेळा पंतप्रधान राहिलेले रॉबर्ट फिको हे बुधवारी हँडलोव्हा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जखमी झाले, असे स्थानिक वृत्तपत्र द स्लोव्हाक स्पेक्टेटरने वृत्त दिले आहे. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंतप्रधान लोकांना भेटण्यासाठी बाहेर आले तेव्हा घटनास्थळी गोळीबार करण्यात आला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पंतप्रधान त्यांचे स्वागत करणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी बाहेर आले तेव्हा गोळ्यांचा ऐकू आल्या. तेव्हा फिको जमिनीवर पडलेले दिसले. कथित शूटरला घटनास्थळी अटक करण्यात आली आणि परिसर रिकामा करण्यात आला. हँडलोवा येथील सरकारी बैठकीनंतर ही घटना घडली, त्यानंतर पंतप्रधानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काल, स्लोव्हाकचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्याचा निषेध करत जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या .
यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितले की, या घटनेबद्दल ऐकून त्यांना धक्का बसला आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्लोव्हाकियाच्या राष्ट्रप्रमुखाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.
“स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेला हल्ला भयावह आहे. आम्ही आमच्या शेजारील भागीदार देशाच्या सरकार प्रमुखाविरुद्धच्या या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो,” असे झेलेन्स्की यांनी X वर लिहिले आहे