Hoarding Collapsed In Pimpri Chinchwad : सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालताना दिसत आहे. तसेच या पावसामुळे अनेक दुर्दैवी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्येही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.
आज पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वारे देखील वाहत होते. या दरम्यान सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग बाजूला उभ्या असलेल्या चार वाहनांवर पडले. यामध्ये ही वाहने जागीच दबली असून मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेल्या होर्डिंगशेजारी पार्क केलेली वाहने होती आणि या वाहनांमध्ये कोणीही नव्हतं. त्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच यासंदर्भात महापालिकेकडून कोणतीही अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये.