लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. येत्या २०
मे रोजी राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील
मतदानानंतर ४८ जागांवरील मतदान पूर्ण होणार आहे. दरम्यान आज मुंबईत महाविकास
आघाडीची आणि महायुतीच प्रचारसभा होणार आहे. २० तारखेला राज्यात ५ व्या टप्प्यातील
मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचारसभेच्या थंडावणार आहेत. आज शिवाजी पार्कवर
महायुतीची प्रचारसभा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे
अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्रितपणे मंचावर येणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्वोच्च
नेते आणि सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि
महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ते सकाळी सर्वात आधी बाराबंकीत जाहीर सभेला
संबोधित करतील. भाजपने आपल्या X
हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा निवडणूक कार्यक्रम शेअर
केला आहे.यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 चा आकडा पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरात
जोरदार प्रचार करत मतदारांकडून आशीर्वाद घेत आहेत.