1865 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राम अधिवेशनावर स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ 1969 पासून 17 मे हा जागतिक दूरसंचार दिवस साजरा केला जातो.जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस चे उद्देश हे आहे की इंटरनेट आणि इतर माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी तसेच डिजिटल फूट कमी करण्याच्या मार्गाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
युनिवर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड म्हणजेच यु एस ओ एफ एप्रिल 2002 पासून भारतामध्ये आणि सार्वत्रिक सेवांमध्ये विशेषतः देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात सार्वत्रिक प्रवेश प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आला. भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडणाऱ्या उपक्रमांना 22 वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या 22 वर्षांमध्ये ग्रामपंचायत टेलिफोन ते ग्रामीण बीबी ते ग्रामीण टाॅवर ते ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि R and D प्रकल्पापर्यंतच्या विविध योजना राबवण्यात आल्या. USOF इंडिया ही सर्वात सक्रिय आणि दोलायमान संस्थात्मक यंत्रणा आहे. याचा उद्देश अन कनेक्टेड तसेच वैविध्यपूर्ण लोकांना जोडण्याचा उदात्त हेतू आहे.
C D O T ने नवोन्मेषक स्टार्टअप MSME आणि इतर भागधारकांना O R A N तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी मदत करण्यासाठी चाचणी बेड विकसित केले आहे. हा उपक्रम OPEN REDIO ACCESS NETWORK च्या क्षेत्रात संशोधन आणि विकासामध्ये सहभाग सुलभ करेल आणि भारताती OPEN REDIO ACCESS NETWORK इकोसिस्टीमच्या प्रसारासाठी चाचणी सुविधेचा विस्तार करेल. भारताने अमृतकालात प्रवेश केला आहे.भारतामध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. भारताने सर्वात वेगाने वाढणारे दूरसंचार नेटवर्क आणि देशातील 680 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G चे जलद रोल आउट पाहिले आहे. स्पेक्ट्रम वाटप पारदर्शक पद्धतीने विक्रमी वेळेत झाले आहे. त्याचबरोबर स्वदेशी 4G/ 5G आणि stack च्या विकासामुळे भारताला जागतिक दूरसंचार शक्ती म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
20 वर्षापूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली DOT आणि USOF विभागाची स्यापना झाली.
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री श्री देवू सिंग चव्हाण यांनी 17 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात जागतिक दूरसंचार आणि माहिती दिनानिमित्त जागतिक दूरसंचार दिन परिषदेचे उद्घाटन केले त्यांनी स्टार्टप्स द्वारे टेलिकॉम मध्ये नवकल्पनांचे प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शनांचे उद्घाटन केले.आणि
U S O F च्या विसाव्या वर्षाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. या व्यक्तिरिक्त दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल उत्कृष्ट कार्यासाठी दूरसंचार विभागाचे कर्मचारी आणि दूरसंचार विभागाच्या सर्वोत्तम कार्यक्षेत्रातील युनिटचा गौरव करण्यात आला. USOF आणि भारत नेटने डिजिटल डिव्हाइड कमी करण्यात आली आणि लास्ट माईल connectivity प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सहा लाखाहून अधिक गावे 4G जोडली आहेत. आणि दोन लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे डिजिटल समावेश झाला आहे दूरसंचार विभागाच्या विविध सुधारणांमुळे राहणीमानात सुधारणा करण्यासाठी व्यवसायात सुलभता आणण्यासाठी नागरिक सेवा प्रदान करण्यासाठी सर्व समावेशक वाढीची पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे.
जयमंगला जोशी,नाशिक
समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत