सांगलीतील एका कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडीओ तयार केला गेला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली.
सांगलीतील कॅफेत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर शिवप्रतिष्ठानच्या युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. सांगलीतील कॅफे हंग ऑन या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. अशा प्रकारचे कॅफे ज्या ठिकाणी सुरू आहेत, ते बंद करा, तसेच कॅफे मालकांना सहआरोपी करण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.