देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत
आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या
निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार
स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात
प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान
करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण
भिवंडी लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास
आघाडीने, वंचित बहुजन
आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय
ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण महाराष्ट्रातील भिवंडी या लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून
घेणार आहोत. महायुतीने भिवंडीमध्ये केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांना
उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना
तिकीट दिले आहे. तर जिजाऊ संघटनेचे
अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवातीला सोपी
वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात थोडीशी आव्हानातम्क दिसत आहे. कपिल पाटील
यांच्या बदल काही भागात असलेली नाराजी आणि कुणबी मतांचे ध्रुवीकरण यामुळे निवडणूक
थोडीशी कठीण झाल्याचे म्हटले जात आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणबी, आगरी आणि मुस्लिम समाजातील बहुसंख्य मतदार आहेत. आगरी समजला फायदा
होईल म्हणून भाजपने कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद दिले होते. मात्र
त्यांच्या मंत्रिपदाचा त्यांना फारसा प्रभाव पाडता आली नाही. भाजपाचे वरिष्ठ
नेतृत्व देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खुश नसल्याचे म्हटले जाते. महाविकास
आघाडीमध्ये उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्याचे दिसून आले. शरद पवार गटाला ही
जागा सुटल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात
सुरेश म्हात्रे यांचा काहीसा वेळ गेला.
जिजाऊ संघटेनचे नेते निलेश सांबरे
यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सुरुवातीला ही निवडणूक कपिल पाटील
यांच्यासाठी सोपी समजली जात होती. मात्र प्रचार पुढे जाऊ लागला तास निवडणूक थोडीशी
कठीण वाटत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये
भिवंडी ग्रामीण, भिवंडी
पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर याचा समावेश होतो.
यंदाच्या निवडणुकीत २७ उमेदवार भिवंडीतून उभे आहेत. मात्र मुख्य लढत ही कपिल पाटील, निलेश सांबरे आणि सुरेश म्हात्रे
यांच्यात होणार आहे. तसेच आगरी,
मुस्लिम आणि कुणबी समाजाची मते महत्वाची ठरणार आहेत. २००९ मध्ये या
ठिकाणी काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. त्यानंतर दोन वेळा कपिल पाटील
हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा ते हॅट्ट्रिक करणार की भिवंडीचा गड
महायुती गमावणार हे ४ जुनलाच स्पष्ट होणार आहे.