हवामान विभागाने (IMD ) दिलेल्या माहितीनुसार मान्सून आज अंदमानात दाखल होणार आहे. तर 31 मे रोजी केरळात धडकणार आहे. यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि 19 आणि 20 मे रोजी राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने 19 आणि 20 मे रोजी राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.याव्यतिरिक्त, तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलमसाठी त्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवारी IMD च्या अंदाजानुसार, 19-21 मे दरम्यान अत्यंत मुसळधार पावसासह दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये 23 मे पर्यंत मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.तर 18 आणि 22 मे रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 18-20 मे रोजी वेगळ्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे IMD ने म्हंटले आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे सध्याची स्थिती ही मान्सूनसाठी पोषक आहे. रविवारी 19 जूनला मान्सून अंदमानात दाखल होईल. मान्सून पुढे सरकण्यासाठी योग्य वातावरण आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.यानंतर तो केरळात ३१ मे पर्यंत पोचून पुढे महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.