वाहतुकीचे शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपण्यासाठी तसेच ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनी या आघाडीच्या जागतिक वाहतूक उत्पादक कंपनीने टीव्हीएस आयक्यूबचे नवे व्हेरिएंट लाँच केले. त्यामध्ये २.२ केडब्ल्यूएच बॅटरी बसवण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनी ग्राहकांना आजपासून टीव्हीएस आयक्यूब एसटीचे वितरण करण्यासाठी सज्ज आहे. टीव्हीएस आयक्यूब एसटी ३.४ केडब्ल्यूएच आणि ५.१ केडब्ल्यूएच या दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध केली जाणार असून हा या क्षेत्रातील सर्वात मोठा बॅटरी पॅक आहे. यासह टीव्हीएस आयक्यूबद्वारे पाच व्हेरिएंट्स ११ रंगांत उपलब्ध करण्यात आले असून ही पर्यायाने बाजारपेठेतील सर्वात आकर्षक ईव्ही श्रेणी बनली आहे.
शाश्वत वाहतूक सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने टीव्हीएस मोटर कंपनीने ईव्ही क्षेत्राशी असलेली बांधिलकी नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह व आनंददायी उत्पादनांसह अधोरेखित केली आहे. सर्वांसाठी ईव्ही उपलब्ध करून देण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी नव्या २.२ केडब्ल्यूएच बॅटरी व्हेरिएंटसह टीव्हीएस आयक्यूब सीरीजची किंमत एक्स शोरूम ९४,९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांसाठी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) आणखी कमी होणार आहे.
टीव्हीएस आयक्यूब तीन मूलभूत तत्वांवर आधारित आहे – ग्राहकांना रेंज, कनेक्टेड तंत्रज्ञान, चार्जिंग सुविधा आणि किंमतीच्या बाबतीत निवडीचे स्वातंत्र्य, वाहन सुरक्षा व खरेदीचा एकंदर अनुभव पूर्णपणे खात्रीशीर, तसेच सोप्या वैशिष्ट्यांच्या मदतीने रायडिंग तसेच एकूण सुलभ वापर. या लाँचमुळे विविध क्षेत्रांतील ग्राहकांना टीव्हीएस आयक्यूबसह ईव्हीचा वापर सुरू करणे शक्य होईल. कारण बडे अरमानों की अच्छी शुरुआत हे ब्रँडचे ब्रीदवाक्य आहे.
नव्या व्हेरिएंटच्या लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीच्या ईव्ही बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनू सक्सेना म्हणाले, ‘टीव्हीएस मोटर कंपनीमध्ये आम्ही या क्षेत्रात नाविन्य आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी बांधील आहोत. टीव्हीएस आयक्यूब परिवार ३ लाखांपर्यंत विस्तारल्याचे पाहाणे आनंददायी आहे. ईव्ही ग्राहकांच्या रायडिंगचे निरीक्षण करून त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे नवी २.२ केडब्ल्यूएच, टीव्हीएस आयक्यूबमधील सर्वात वेगवान चार्जिंग व्हेरिएंट आणि टीव्हीएस आयक्यूब एसटीमधील आणखी एक व्हेरिएंट लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीएस आयक्यूब सीरीज आता बॅटरीच्या तीन पर्यायांसह पलब्ध होणार असून त्यामुळे ग्राहकांना रेंज व किंमतीचे योग्य समीकरण मिळण्यास मदत होईल. टीव्हीएस आयक्यूब सीरीज लवकरच देशभरात उपलब्ध वितरणासाठी उपलब्ध केली जाणार आहे. टीव्हीएसएम ग्राहकांच्या यशात भागीदार होण्याची परंपरा सुरूच ठेवेल आणि त्यासाठी इलेक्ट्रिक वाहतूक सुविधा अधिक विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध करण्यावर कंपनीचा भर असेल.’
संपूर्ण टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक सीरीज आता भारतातील ४३४ शहरांतील दालनांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.