नव्या भारताचे कौतुक करताना, डेली एक्सप्रेस या ब्रिटिश वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक सॅम स्टीव्हन्सन यांनी म्हंटले आहे की, भविष्यात 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने वाटचाल करत असलेल्या भारताबाबत कितीतरी सकारात्मक कथा सांगण्यासारख्या आहेत.
सार्वत्रिक निवडणुकांचा अभ्यास करण्यासाठी सध्या ते भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
वास्तविक जीवनात भारत हा पाश्चिमात्य देशांनी रंगवलेल्या चित्रापेक्षा वेगळा आहे का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “दुर्दैवाने, संपूर्ण युरोप आणि पश्चिमेकडील देशांची भारताबद्दलची समज चांगली नाही. आणि याचे कारण असे की आम्हाला प्रेसमधून नकारात्मक बातम्या दिल्या जात आहेत,”
“मला असे वाटते की दुर्दैवाने भारतातल्या भारतविरोधी ‘बकवास’चा हा परिणाम आहे. स्टीव्हनसन यांनी पुढे ठळकपणे सांगितले की बाहेरचे लोक भारताबद्दल धार्मिक विभाजनासारख्या गोष्टी ऐकत आहेत, परंतु भारतात प्रत्यक्षात तसे नाही हे आम्ही बघितले. “आम्ही नरेंद्र मोदींच्या रॅलीत मुस्लिम महिलांना पूर्ण बुरख्यात हजेरी लावताना पाहिलं आहे. आम्ही या महान आणि अद्भुत राष्ट्राच्या बहुलवादाची उदाहरणे पाहिली आहेत. आम्ही या राष्ट्राबद्दलची ब्रिटीश मीडियाच्या कव्हरेजची पातळी वाढवण्यासाठी आलो आहोत.
पण येथे येऊन ग्राउंड रिपोर्टिंगवर न्यू इंडियाच्या खऱ्या, सकारात्मक गोष्टी सांगण्याची गरज आहे,” असे म्हणत स्टीव्हनसन पुढे म्हणाले की संपूर्ण युरोप आणि पश्चिमेकडील भारताबद्दलची धारणा चांगली नाही.
प्रेसमधून आमच्यापर्यंत या देशाबद्दल नकारात्मक कथा पोचत आहेत यावर जोर देताना स्टीव्हनसन पुढे म्हणाले की, “ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे पण, लोकांना येथे येण्याची गरज आहे,इथे तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पहावे लागेल, ते जगावे लागेल, मी आवाहन करतो की, लोकांनो,इथे या ,इथल्या लोकांशी बोला,आणि तुम्हाला दिसेल की, नवीन भारत,हा एक महासत्ता बनत आहे. तुम्ही मैदानात उतरून खऱ्या मुस्लिमांशी बोलाल, तुम्ही हिंदू, शीख यांच्याशी बोलाल तेव्हा तुम्हाला दिसेल.की भारत सर्व संस्कृती किंवा धर्म स्वीकारत आहे,”
भारताला “महान आणि अद्भुत राष्ट्र” असे संबोधत हे राष्ट्र विलक्षण असल्याचे स्टीव्हनसन म्हणले आहेत.