Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. तसेच आता कंगनाने ही राजकारणात सक्रिय झाली असून तिला भाजप पक्षाकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात तिकिट मिळाले आहे. त्यामुळे सध्या कंगना तिच्या पक्षाचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच आता कंगनाने एका मुलाखतीदरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुलाखतीत कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यास बॉलिवूड इंडस्ट्री सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगनाने होकारार्थ उत्तर दिले.
बॉलिवूडबाबत कंगना रणौत म्हणाली की, “हे चित्रपट विश्व खूप खोटं असून तिथली प्रत्येक गोष्ट बनावट आहे. ते पाण्याच्या खोट्या बुडबुड्याप्रमाणे चकचकीत विश्व निर्माण करतात, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात.”
कंगनाच्या बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाबाबत अनेक लोक, तिचे चाहते नाराज होतील, असं म्हटल्यावर कंगना म्हणाली, “हो हे खरं आहे, कारण मला अनेक दिग्दर्शक म्हणत असतात की, आमच्याकडे एक चांगली हिरोइन आहे. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडून तुम्ही जाऊ नका. तसेच मी अभिनय चांगला करते पण ठीक आहे. मी त्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असते”, असंही कंगनाने सांगितलं.