आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याबाबत घडलेल्या कथित मारहाणी संदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी बिभव कुमार यांच्या अटकेवरून आता भाजपनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया पुढे आली आहे. ‘आप’ने आणलेल्या कायद्यानुसार ही अटक झाली असल्याचे काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले आहेत.
रविवारी एएनआयशी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मालिवाल आणि बिभव यांच्यात नेमके काय घडले हे योग्य तपासानंतरच स्पष्ट होईल.
स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्यात नेमके काय घडले हे “केवळ सखोल चौकशीतूनच बाहेर येईल आणि कोणत्याही वाजवी संशयापलीकडे निश्चित केले जाईल. पण जेव्हा ‘निर्भया’ (राष्ट्रीय राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर भीषण आणि जीवघेणा सामूहिक बलात्कार झाला होता. ) घटना घडली, तेव्हा हाच AAP रस्त्यावर उतरला आणि त्यांनी कायद्यासाठी आवाज उठवला ज्यानुसार लैंगिक अपराध किंवा महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडितेचे विधान सत्य मानले जाईल आणि त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल हा मसुदा तयार केला गेला आणि तो अंमलात आणला गेला,
परंतु आता, जेव्हा एका महिलेने तिच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला, तेव्हा मात्र ‘आप’च तिला खोटे ठरवण्यात पुढे आले आहे. तर मग या कायद्याचे महत्व काय शिल्लक राहणार असे , “दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र असलेल्या संदीप दीक्षित यांनी प्रतिपादन केले आहे.