Loksabha Election 2024 : आज (20 मे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण 685 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये राजनाथ सिंह, राहुल गांधी, स्मृती इराणी यांच्या लढतीकडे देशाचं लक्ष आहे. तर महाराष्ट्रातही अनेक दिग्गज उमेदवारांच भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे कल्याण मतदारसंघांचा समावेश आहे. तर मुंबईतील सर्व सहा ठिकाणच्या लढतीमध्ये वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, उज्वल निकम, यांचं भवितव्यही आजच्या मतदानातून ठरणार आहे.
आजच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 5, उत्तर प्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 7, जम्मू आणि काश्मीरमध्ये 1, लडाखमध्ये 1, झारखंडमध्ये 3 आणि ओडिशातील 5 जागांवर मतदान पार पडत आहे.
आज महाराष्ट्रात मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ठाणे कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा 1३ लोकसभा मतदारसंघातहो मतदान पार पडत आहे.