Ram Naik : आज (20 मे) सकाळी 7 वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशात मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात उद्या 49 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण 685 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
आजच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 7, बिहारमध्ये 5, जम्मू आणि काश्मीरमध्ये 1, लडाखमध्ये 1, झारखंडमध्ये 3 आणि ओडिशातील 5 जागांवर मतदान पार पडत आहे. तर महाराष्ट्रात मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ठाणे कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघातहो मतदान पार पडत आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसामान्य जनेतसह अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. यामध्ये आता भाजपचे ज्येष्ठ नेचे राम नाईक हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. राम नाईक हे 90 वर्षांचे असून ते सकाळीच मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. ते गोरेगावमधील पहाडी हायस्कूल मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.