Farhan Akhter : आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात उद्या 49 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण 685 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
आजच्या या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करण्यासाठी आज सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. यामध्ये आता अभिनेता फरहान अख्तरनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.
फरहान अख्तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर पोहोचला होता. यावेळी त्याने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, “सर्व लोकांची काळजी घेणारे सरकार आहे, माझे मत हे सुशासनासाठी आहे. तसेच तुम्हीही कृपया बाहेर पडा आणि मतदान करा.”