इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले या घटनेला आता १६ तास उलटून गेले आहेत. तरीही त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. शोध आणि बचाव पथकाचे सदस्य हेलिकॉप्टरचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही.
अझरबैजानच्या भेटीनंतर राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे इराणला परतत असताना रविवारी दुपारी खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले.
रईसी यांच्यासह इराणचे पराराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहिया हेदेखील या हेलिकॉप्टर मध्ये होते.तसेच तबरीझमधील प्रार्थनेचे प्रमुख होज्जातोलस्लाम अल हाशेम, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती आणि इतर अनेक जण होते.
दिवसभर असलेल्या दाट धुक्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.सीएनएन हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुर्गम पर्वतांवरून अचूक हवामानचा अंदाज लावणे अवघड आहे.
दरम्यान, युरोपियन युनियनने इराणच्या नेत्याला शोधण्यात मदत करण्यासाठी आपली जलद प्रतिसाद मॅपिंग सेवा सक्रिय केली आहे. युरोपियन कमिशनर फॉर क्रायसिस मॅनेजमेंटने इराणी अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सेवा सक्रिय करण्याची घोषणा केली आहे. .
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या पूर्व अझरबैजान प्रांतातील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कमांडरच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर आणि क्रॅश साइटवरील क्रू सदस्यांपैकी एकाचा मोबाईल फोनवरून सिग्नल प्राप्त झाला आहे. IRNA च्या म्हणण्यानुसार कमांडरने सांगितले की, “लष्करी दल त्या ठिकाणी जात आहेत आणि काही चांगली बातमी मिळण्याची आशा आहे.