लोकसभा निवडणुकीसाठी आज देशभरात ५ व्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. देशातील ४९ जागांवर मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत पाचव्या टप्प्यासाठी ४९ जागांसाठी १०.२८ टक्के मतदान झाले आहे. आजच्या टप्प्यात ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज मतदान सुरु आहे.
बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंडमध्ये ११.६८ टक्के, लडाखमध्ये १०.५१ टक्के, महाराष्ट्रात ६.३३ टक्के, ओडिसामध्ये ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५. ३५ टक्के मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत झाले आहे. ओडिशा राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक देखील होत आहे. त्या ठिकाणी सकाळी ९ पर्यंत ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी ८ कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यामध्ये ४.६९ पुरुष तर ४. २६ कोटी महिला आणि यांचा समावेश आहे.