इराण साठी मोठी आणि वाईट बातमी समोर आली असून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध लागला असून त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
देशाच्या वायव्य भागात एक दिवसापूर्वी अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमधील परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान आणि इतर सर्वांचाही यात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांच्यासह इराणचे पराराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान .तसेच पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधले जवळपास सर्वजण ठार झाले आहेत. तस्नीम न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वायव्य इराणमध्ये रविवारी क्रॅश झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण नऊ लोक होते, ज्यात तीन अधिकारी, एक इमाम आणि उड्डाण आणि सुरक्षा दलाचे सदस्य होते.
इराण-अझरबैजान सीमा भागातून परतल्यानंतर रायसी इराणच्या वायव्येकडील तबरीझ शहराकडे जात असताना हेलिकॉप्टर दाट धुक्यामुळे अपघातग्रस्त झाले होते.
राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत नाहीयत असं इराणच्या सरकारी टेलीविजनने म्हटलं आहे. “राष्ट्रपती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या हौतात्म्यानंतर, सरकारी मंत्रिमंडळाने तातडीची बैठक बोलावली असल्याचे राज्य वृत्तसंस्था IRNA ने वृत्त दिले आहे,
दरम्यान, अल जझीराच्या एका पत्रकाराने सांगितले की, “हेलिकॉप्टरचे अवशेष पाहता, अशा अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. हेलिकॉप्टरची संपूर्ण केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. तसेच इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार “काही मृतदेह ओळखण्यापलीकडे जळले आहेत त्यामुळे ओळख पटवणे अवघड जात आहे.
रेड क्रिसेंटने घेतलेल्या अवशेषांचे ड्रोन फुटेज तिथल्या माध्यमांवर प्रसारित केले गेले. एका निळ्या आणि पांढऱ्या शेपटीच्या पलीकडे हेलिकॉप्टरचा थोडासा भाग उरलेल्या, उंच, जंगली टेकडीवर क्रॅश साइट दाखवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
राष्ट्रपती रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे खोयलार गाव ते केलेम या मार्गावर अवशेष आढळून आले आहेत. तस्नीम न्यूज एजन्सीने वर्जेकन येथून वृत्त दिले की, अपघात स्थळाच्या संभाव्य जागांची घोषणा झाल्यानंतर, बचाव पथके ताबडतोब नियुक्त केलेल्या ठिकाणी गेले, परंतु हेलिकॉप्टरचे कोणतेही चिन्ह नव्हते.खोयलार ते केलेम मार्गावर दिवसा उजाडल्याने शोध मोहीम सुरूच होती.त्यानंतर बचाव पथकांना एका टेकडीवर हेलिकॉप्टरचे ब्लेड आणि पंख दिसले आणि त्यांनी ताबडतोब टेकडीच्या दिशेने आपला शोध चालू केला.
इराणी रेड क्रेसेंटच्या प्रमुखाने ठळकपणे सांगितले की, बचाव पथकांच्या व्हिडिओंनुसार, हेलिकॉप्टरच्या संपूर्ण केबिनचे लक्षणीय नुकसान झाले आहे आणि सगळे जळून गेले आहे.
.
इराण प्रथमच अशा परिस्थितीतून जात आहे. राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री असे अपघातात बेपत्ता झाल्याचे देशाने कधीही पाहिले नाही, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.