आज देशात लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील 49 जागांवर मतदान होत आहे. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून संपूर्ण देशभरात मतदानाला सुरूवात झाली आहे. तर आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 23.66 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाले आहे.
देशातील मतदानाची आकडेवारी
1. पश्चिम बंगाल – 32.70%
2. उत्तरप्रदेश – 27.76%
3. बिहार – 21.11%
4. झारखंड – 26.18%
5. जम्मू काश्मीर – 21.37%
6. लडाख – 27.87%
7. ओडिशा – 21.07%
8. महाराष्ट्र – 15.97%