Randeep Hooda : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात उद्या 49 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण 685 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत. तर महाराष्ट्रात मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ठाणे कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघातहो मतदान पार पडत आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. यामध्ये आता बॉलिवडू अभिनेता रणदीप हुडाने देखील मतदानाचा हक्क बजावला.
रणदीप हुडाने मतदान केल्यानंतर चाहत्यांना मतदानं करण्याचं आवाहन केलं. “लोकशाहीमध्ये मतदानाद्वारे तुम्हाला तुमचं आणि तुमच्या देशाचं भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही मतदान केलंच पाहिजे. या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि मतदान करा”, असं रणदीप हुडा म्हणाला.