अखेर बारावीची परीक्षा दिलेल्या विदयार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.
गेले कित्येक दिवस बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर आता उद्या म्हणजे मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबद्दलची माहिती
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक
मंडळाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
मंगळवारी म्हणजेच दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
त्यामुळे आता विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता व उत्सुकता वाढली आहे. राज्य
माध्यमाइक मंडळाकडून फेब्रुवारी व मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली
होती. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यानी नोंदणी केली
होती.
कोणत्या संकेत स्थळावर पाहू शकता बारावीचा निकाल?
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in