अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस झाल्याने
अफगाणिस्तानमधील घोर प्रांतामध्ये अचानक महापूर आल्याची घटना घडली आहे. अचानक
आलेल्या पाण्यामुळे तब्बल ८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबान सरकारने याबद्दल
माहिती दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. फर्याब प्रांताच्या
गव्हर्नरचे प्रवक्ते इस्मतुल्ला मुरादी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री
प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरात किमान ८४ लोकांचा
मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले, तर आठ जण बेपत्ता आहेत. ते म्हणाले की,
शुक्रवारी
पुरात इतर लोकांचा मृत्यू झाला.
पुढे बोलताना मुरादी म्हणाले,
”अचानक
आलेल्या महापुरामुळे १,५०० घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे, शेकडो
हेक्टर शेतजमीन नष्ट झाली आहे आणि ३०० हून अधिक जनावरे मारली गेली आहेत.
अफगाणिस्तानमध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील गोर
प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते अब्दुल वाहिद हमास यांनी दिलेल्या माहितीनुसार,
वाईटरित्या
प्रभावित प्रांतात शुक्रवारच्या पुरात ५० लोकांचा मृत्यू झाला.