इराणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लायान यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अपघातादरम्यान इराणचे दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी दाट धुक्यात हेलिकॉप्टर डोंगर ओलांडत असताना अपघात झाला.
अपघातापूर्वी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरचा अधिकाऱ्यांशी संपर्क तुटला होता. दरम्यान, आता नवीन माहिती इराणच्या प्रेस टीव्हीने शेअर केली आहे. प्रेस टीव्हीने दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. स्क्रीनशॉट शेअर करताना इराणच्या प्रेस टीव्हीने सांगितले की, डोंगराळ भागात दाट धुक्यामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. तर आता या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ही दुर्घटना इराणची राजधानी तेहरानपासून 600 किमी दूर अझरबैजानमध्ये घडली आहे. lतर या हेलिकॉप्टर अपघातानंतर सातत्याने शोधमोहीम सुरू होती.
दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर इराण सरकार सातत्याने बैठका घेत आहे. तसेच इब्राहिम रायसी यांची जबाबदारी आता उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर यांच्याकडे दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.