Maharashtra Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात उद्या 49 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण 685 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत. तर महाराष्ट्रात मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ठाणे कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघातहो मतदान पार पडत आहे.
आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे. तर आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 48.66% टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील मतदानाची आकडेवारी
1. ठाणे – 45.38%
2. नाशिक – 51.16%
3. पालघर – 54.32%
4. दक्षिण मुंबई – 44.22%
5. दक्षिण मध्य मुंबई – 48.26%
6. उत्तर मुंबई – 46.91%
7. उत्तर मध्य मुंबई – 47.32%
8. उत्तर पूर्व मुंबई – 48.67%
9. उत्तर पश्चिम मुंबई – 49.79%
10. धुळे – 48.81%
11. भिवंडी – 48.89%
12. दिंडोरी – 57.06%
13. कल्याण – 41.70%