Loksabha Election 2024 Voting : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर आज मतदान पार पडले. देशातील ओडिशा, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि दोन केंद्र शासित प्रदेश या ठिकाणी मतदान पार पडले आहे.
उत्तर प्रदेशमधील १४ जागा, महाराष्ट्रातील १३ जागा, पश्चिम बंगालमधील ७ , बिहार आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ५ जागांवर मतदान झाले. जम्मू काश्मीर आणि लडाख मधील प्रत्येकी एका जागेवर मतदान पूर्ण झाले आहे. तर आज संध्याकाळी 7.45 पर्यंत देशभरात एकूण 57.47 टक्के मतदान झाले आहे.
देशातील मतदानाची आकडेवारी
1. पश्चिम बंगाल – 73%
2. उत्तरप्रदेश – 55.80%
3. बिहार – 52.35%
4. झारखंड – 61.90%
5. जम्मू काश्मीर – 54.21%
6. लडाख – 67.15%
7. ओडिशा – 60.55%
8. महाराष्ट्र – 48.66%