आज अखेर राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे. दरम्यान दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार असल्याने, विद्यार्थ्यांची चिंता आणि उत्सुकता वाढली आहे.
राज्यात बारावीचा निकाल यंदाच्या वर्षी ९३.३७ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही कोकण विभागाने प्रथम क्रमांक आणला आहे. कोकण बोर्ड सर्वात अव्वल ठरले आहे. ९१.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९१.६० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.