CM Yogi Adityanath On Rahul Gandhi : काल (20 मे) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चंदीगडमध्ये जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधत म्हटले की, जेव्हा आपण 400 पारबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसला चक्कर येते कारण काँग्रेस स्वतः 400 जागांवर निवडणूक लढवत नाही.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, सध्या संपूर्ण देशात मोदीजी पुन्हा येणार असे वातावरण आहे. ज्यांनी राम आणला त्यांना आम्ही आणू असे जनता म्हणत आहे आणि जे रामाचे नाहीत त्यांचा काहीही उपयोग नाही. तसेच काँग्रेस रामविरोधी असल्याचेही योगी म्हणाले. काँग्रेस विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि बौद्धिकताविरोधी आहे. त्यांचे मित्रपक्षही राम मंदिराला विरोध करत आहेत.
काँग्रेसचे लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर दंगली होतील, पण मी म्हणालो की जर दंगल झाली तर उलटं टांगेन. तसेच आता उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी रस्त्यावर नमाज अदा करणे बंद केले आहे आणि मशिदींमधून लाऊडस्पीकरही खाली येऊ लागले आहेत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा देशावर कोणतेही संकट येते तेव्हा राहुल गांधी सर्वात आधी देश सोडून जातात. मात्र, त्यांनी देशाला नेहमीच त्रास दिला, मग ते नक्षल संकट असो वा दहशतवाद, अशी टीकाही योगींनी केली.