पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये (Pune Porsche Car Accident) भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालक असलेल्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.कल्याणीनगरमध्ये घडलेल्या या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आल्यामुळे हे प्रकरण जास्त तापले आहे. .या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पाोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आता या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तअमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आमच्यवर कोणाचाही दबाव नसून कडक कारवाई करणे हीच आमची भूमिका आहे, हे देखील अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. कुमार म्हणाले आहेत की ,रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा. मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले आहेत. . मद्य पिऊन रहादारीच्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे
तसेच आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे . ज्य दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर कधी नव्हताच पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांनी आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे.असे यावेळी म्हणाले आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच पुणे अपघातप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. .