काही दिवसांपूर्वी बंगलोरच्या रामेश्वरम कॅफे इथे स्फोट झाला होता. त्या प्रकरणाशी संबंधित काही ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA चे छापेमारी केली आहे. एनआयने बंगलोर आणि कोईम्बतूर या शहरांमध्ये एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. कुमारस्वामी लेआऊट आणि बनशंकरी या ठिकाणी छापेमारी केली आहे. जाफर इक्बाल आणि नयन सादिक नावाच्या डॉक्टरांच्या कोईम्बतूरमधील दोन घरांवर तपास यंत्रणेने छापे टाकल्याचे समजते आहे. याप्रकरणी स्फोट घडवणाऱ्या दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, २ मार्च रोजी बंगलोरमधील रामेश्वरम या कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात चार लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. तसेच या स्फोटानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली होती. बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि मदतकार्य सुरु करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनाही कसून तपास करत आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र याच प्रकरणाशी संबंधित काही ठिकाणी एनआयने छापेमारी केली आहे.