ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ऑडी क्यू७ बोल्ड एडिशनच्या लाँचची घोषणा केली, ज्यामध्ये आकर्षक ब्लॅक डिझाइन आहे तसेच आकर्षकता व अत्याधुनिकता दिसून येते. बोल्ड एडिशनमध्ये ग्लॉस ब्लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्लॅक ऑडी रिंग्ज, ब्लॅक विंडो सराऊंड्स, ब्लॅक ओआरव्हीएम आणि ब्लॅक रूफ रेल्स आहेत. ९७,८४,००० रूपये किंमत असलेली ही बोल्ड एडिशन निश्चितच वैयक्तिक अभिव्यक्ती व्यक्त करण्याची इच्छा असलेल्या ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेईल. मर्यादित युनिट्स उपलब्ध असण्यासह ऑडी क्यू७ बोल्ड एडिशन ग्लेशियर व्हाइट, मिथोज ब्लॅक, नवारा ब्ल्यू आणि समुराई ग्रे या चार एक्स्टीरिअर रंगांमध्ये उपलब्ध असेल.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी क्यू७ ऑडी क्यू समूहामधील आयकॉन राहिली आहे, ज्यामध्ये उल्लेखनीय ड्रायव्हिंग गतीशीलतेसह अविश्वसनीय वैविध्यतेचे उत्तम संयोजन आहे. या बोल्ड एडिशनच्या लाँचसह आम्ही ग्राहकांना विशिष्ट स्टायलिंग घटकांनी युक्त अधिक आकर्षक व्हेरिएण्ट प्रदान करत आहोत, जेथे ही वेईकल रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ऑडी क्यू७ स्पेशल एडिशन शक्तिशाली स्टेटमेंट करण्याची आणि आरामदायीपणा, आकर्षकता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण मिश्रणाचा शोध घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.”