विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत कल्याणीनगर येथे हायप्रोफाईल कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांसह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. श्रीमंत वडिलांच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर येथे भरधाव वेगाने कार चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोर्टाने आरोपीला काही नियम आणि अटीशर्तींसह जामीन मंजूर केला. मात्र त्यांत सोशल मीडियामार्फत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गर्भश्रीमंत वडिलांचा मुलगा असल्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात व्हीआयपी वागणूक मिळाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. आता या सर्व घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आज अचानक पुणे पोलीस आयुक्तलयात दाखल झाले आहेत.
कल्याणीनगर येथील घटनेबाबत राज्य सरकार गंभीर झाले आहे. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणी दखल घेऊन देवेंद्र फडणवीस पुणे आयुक्तलयात दाखल झाले. पोलिसांबरोबर बैठक घेऊन कोणताही दबाब न घेता कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई पोलिसांनी कराव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यपान करत वेगाने सुपरकार चालवत दोन जणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूण आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अग्रवाल यांच्या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच त्याला काही अटीशर्तींसह जामीन मिळाल . तर आता त्या मुलाचे वडील, व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.