Kangana Ranaut : भाजप उमेदवार कंगना रणौतने एका सभेदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी तिने तिच्या आणि त्यांच्यातील फरक समजावून देण्याचा प्रयत्न केला. मंचावरून कंगनाने मंडीतील उमेदवार जयराम ठाकूर यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा तीव्र निषेध केला आणि त्यांना धडा शिकवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कंगना म्हणाली, विक्रमादित्य जामिनावर बाहेर आहेत आणि ते मला अपवित्र म्हणतात. मी चित्रपटात काम केले आहे, मला माझ्या गुणवत्तेवर 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळाले आहेत. तसेच तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या नावावर नाही तर तुमच्या नावावर मत मागा, मग बघा तुम्ही सुरक्षा ठेव जप्त केली जाईल”, अशी टीका कंगनाने केली.
पुढे कंगनाने काँग्रेसजनांना खुले आव्हान दिले. ती म्हणाली, “विक्रमादित्य यांनी मला सांगितले की मी ज्या मंदिरात जाईन ते साफ कर. हे काँग्रेसवाले हिमाचलच्या मुलींचे दर विचारतात, जर कुठेही अशी लोकं दिसली तर त्यांना अशी कानाखाली मारा की ते भाज्यांचेही दर विचारायला विसरतील”, असा घणाघात कंगनाने केला.
“4 जूनला त्यांना अशी कानाखाली भेटावी ते की महिला आणि पहाडी मुलींचा अपमान करायचं विसरून जातील. मला माहित आहे की मला मातृशक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे. तसेच मला मंडीमध्ये एवढी आघाडी मिळावी की पहाडी कन्येच्या व्यक्तिरेखेबद्दल कोणी काही बोलू शकणार नाही”, असंही कंगना म्हणाली.