उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज सकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी, त्यांचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान आणि हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानला रवाना झाले.असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
“व्हीपी जगदीप धनखड हे भारताचे प्रतिनिधी म्हणून इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री एच. अमीर-अब्दोल्लाहियान यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आयोजित समारंभात उपस्थित राहण्यासाठी तेहरानला भेट देत आहेत,” असे एमईएचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एक्स वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
रायसी यांचा अंत्यसंस्कार सोहळा उत्तर-पश्चिम भागातील तबरीझ शहरात सुरू झाला असल्याने इराणमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेले दिसून आले.
भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे सरकार आणि लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे.”परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी 21 मे रोजी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन दु:खद नुकसानाबद्दल भारताचे शोक व्यक्त केले,” असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.
इराण सरकारने आज बुधवारी सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली आहे आज तेहरानमध्ये देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला यांच्या प्रमुख प्रार्थनेसह अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. रायसी यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या जन्मस्थानी, मशहद येथे दफन केले जाईल, अशी घोषणा प्रजासत्ताकचे उपराष्ट्रपती मोहसेन मन्सौरी यांनी केली आहे. .
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदींनी भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी रईसी यांच्या योगदानाचे स्मरण केले.
“इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या दुःखद निधनाने अत्यंत दु:ख आणि धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. . या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे,असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
सोमवारी इराणमध्ये पाच दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि देशभरातील कार्यालये बंद ठेवून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. होती. तर 21 मे रोजी भारताने राष्ट्रीय शोक दिवस पाळला होता.