Raj Thackeray : आज (22 मे) वर्ल्ड चाईल्ड ओबेसिटी दिन आहे. या दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये मुलांनी वजन कसं कमी करावं? याबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं आणि काही खास उपाय सांगितले.
यावेळी वजन कमी करण्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, “जर मला कळलं असतं तर मी देखील वजन कमी केलं नसतं का? आमच्या घरी आमची सून डॉ. बोरूडे आल्या आणि माझं वजन वाढू लागलं”, असं मजेशीर उत्तर राज ठाकरेंनी दिलं.
“लठ्ठपणा कमी करण्यासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळायला हवेत. यामुळे 470 कॅलरीज कमी होतात. मी देखील दररोज बॅडमिंटन खेळतो. तसेच लठ्ठपणावर तज्ञांनी काही उपाय सांगितले पाहिजेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “जेव्हापासून फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे तेव्हापासून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे. फास्ट फूड चवीला चांगलं असतं पण ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. त्यामुळे नेहमी घरचं जेवण आरोग्यासाठी चागलं असतं”, असंही राज ठाकरे म्हणाले.