सध्या देशाती वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. मान्सून देखील अंदमानात दाखल झाला आहे. काही दिवसांत तो केरळ आणि मग महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र देशातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे तर, अनेक ठिकाण उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे. दिल्ली,राजस्थानसह अनेक ठिकाणी नागरिकांना सकाळपासूनच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
उत्तर भारतात हवामानात उष्णता वाढत असताना दुसरीकडे दक्षिण भारतात हवामानात बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. मागच्या एक दोन दिवसांत केरळमध्ये देखील मोठा पाऊस झाला. त्यामुळे तेथील नागरिकांना उन्हाळ्यापासून दिलासा मिळाला आहे. दक्षिण भारतातील राज्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर २४ मे पर्यंत उत्तर भारतात उष्णेतची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून , हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.