वय वर्षे पंचवीसखालील युवकांना मद्यविक्री करू नये,’ असा स्पष्ट नियम राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील वर्षभरात शहर व ग्रामीण भागातील किती पब आणि हॉटेलवर कारवाई केली, याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडेच उपलब्ध नाही.परंतु वेळेच्या बंधनाप्रमाणेच या तरतुदीकडे हॉटेल चालकांकडून दुर्लक्ष करून मद्यविक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. तर उत्पादन शुल्क विभागही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.
शहरात परवानाधारक मद्यविक्री हॉटेलची संख्या मोठी आहे. तर बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हॉटेल, पबची संख्या ही देखील मोठी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना देताना त्यामध्ये वय वर्ष 25 च्या आतील तरुणांना मद्यविक्री करता येणार नाही, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे.
25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे नेमकी या तरतुदीचा भंग केल्या प्रकरणी किती हॉटेलवर कारवाई झाली, हे सांगता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.