गेले काही दिवस सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी थोडीशी निराशाजनक आहे. सध्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. चांदीचा दर सध्या ९५ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत चांदीचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चांदीचा दर येत्या काही दिवसांत ९५ हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे. चांदीचा दर १ लाख रुपयांपर्यंत जाण्याची अंदाज आहे. सततच्या वाढीमुळे MCX चांदीचा दर हा १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस १ लाख रुपये किलो असा चांदीचा दर होऊ शकतो असा अंदाज आहे. सध्या चांदीचा दर हा एक किलो चांदीसाठी ९४८६८ रुपये इतका आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे.