लोकसभा निवडणुकीसाठी ५ व्या टप्प्यातील मतदान पार पडले. अजून दोन
टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशमधून भाजपने अभिनेत्री कंगना
रानौतला तिकीट दिले आहे. कंगनाला रानौतला मंडी या लोकसभा मतदार संघात तिकीट दिले
आहे. तर काँग्रेसने कंगना रानौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंग यांना तिकीट दिले
आहे. दरम्यान विक्रमादित्य सिंह यांनी कंगना रानौतवर टीका केली आहे. कंगना रानौत
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला चांगली स्पर्धा देत आहेत.
एएनआयशी बोलताना विक्रमादित्य सिंग म्हणाले, “मी
तिला (कंगना रणौत) नुकतेच कठीण प्रश्न विचारले आहेत, परंतु ती नेहमीच
त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही महिला विरोधी आहोत असा आरोप करत
असते. तिचा मनोरंजनाचा काळ आता हिमाचल प्रदेशात पूर्ण झाला आहे. एवढी विधाने केली
की, ऐकून लोकांना हसू आवरता आले नाही.सध्या ती कॉमेडियन कपिल शर्माला
चांगली स्पर्धा देत आहे. मला अस वाटत की तिने 4 जूननंतर मुंबईत जाऊन चित्रपट करावेत”
1 जून रोजी हिमाचल प्रदेशमधील 4
जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान मंडी लोकसभेमध्ये कंगना रानौत विरुद्ध
विक्रमादित्य सिंग यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. कंगना आणि विक्रमादित्य
यांच्या प्रचार सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मंडीची जनता 1
जून रोजी कोणाला आपला खासदार म्हणून निवडून देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.