लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना कधी कधी स्टार प्रचारक बोलण्याच्या
भरात एखादे वाक्य गडबड असणारे बोलून जातात. या सर्वांवर निवडणूक आयोगांचे बारीक
लक्ष असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान निवडणूक आयोगाने धर्म, जाती,
समाज
यांवर वक्तव्य केल्यामुळे भाजपा व कॉँग्रेस पक्षाला कारवाई केली आहे. दोन्ही
पक्षांना अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जेपी
नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना यासंदर्भात नोटीस पाठवली
आहे. या नोटिशीमधून आपले भाषण दुरुस्त करणे, भाषण करताना
सावधानता बाळगणे अशा अनेक गोष्टींची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. भाजप आणि
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी केलेल्या निवडणूक प्रचाराचा दर्जा कमालीचा घसरला आहे,
त्या
पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.