काल हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यावर आज मशहद या पवित्र शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दफनविधीला सुपुर्द-ए-खाक असे म्हंटले जाते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातून अनेक नेते आले आहेत. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचाही त्यात समावेश आहे. धनखड काल इराणमध्ये पोहोचले. दिवंगत राष्ट्राध्यक्ष रायसी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्यासह या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नऊ जणांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारताचे उपराष्ट्रपती धनखर यांनीही इराणचे कार्यवाहक राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मोखबर यांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. 21 मे रोजी पूर्व अझरबैजान प्रांतातील ताब्रिझ शहरात सकाळी 9:30 वाजता दफनविधीमधला पाहील कार्यक्रम पार पडला. . यानंतर हा सोहळा हजरत मसूमेहच्या पवित्र स्थानापासून कोम शहरातील जमकरन मशिदीपर्यंत झाला.
पुढच्या टप्प्यात तेहरानमधील इमाम खोमेनी यांच्या मोसल्ला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी साडेसात वाजता तेहरानमध्ये अंतिम प्रार्थना झाली. येथून तेहरान विद्यापीठ ते आझादी चौकापर्यंत अंत्ययात्रा निघाली. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यावर आज दुपारी इराणमधील मशहद या पवित्र शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक जमले आहेत.