Shah Rukh Khan Health : बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खानची बुधवारी (22 मे) अचानक प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला तातडीनं अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सध्या शाहरूखची प्रकृती स्थिर असून त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
शाहरूख खानला उष्माघाताचा त्रास झाला होता, त्यामुळे त्याला तातडीनं रूग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. याबाबतची माहिती मिळताच त्याची पत्नी गौरी खानने तात्काळ हॉस्पिटल गाठले. तर आता मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखची प्रकृती स्थिर असून त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात शाहरूखच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने बाजी मारली आहे. तर या विजयानंतर शाहरूखने स्वत: मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले होते आणि विजयाचा जल्लोष साजरा केला होता. यानंतर शाहरूखची प्रकृती बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.