पुण्यातील कल्याणीनगर येथे हायप्रोफाईल अपघात झाला होता. त्यामध्ये
दोन जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आता या प्रकरणात बालहक्क कोर्टाने आरोपी
वेदांत अगरवाल याचा जामीन रद्द केला आहे. आता पुढील १४ दिवसांसाठी त्याची रवानगी
बालसुधारगृहात करण्यात आली आहे. वेदांत अगरवालने दारूच्या नशेत गाडी चालवून
कल्याणीनगर येथे दोन जणांचा जीव घेतला होता.
आरोपी वेदांत अगरवालला अटक केल्यानंतर
सर्वात प्रथम कोर्टाने त्याला काही अटींसह जामीन दिला होता. मात्र कोर्टाच्या या
निर्णयाबद्दल नागरिकांमध्ये संताप असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मात्र
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कोर्टात अपील
केले. त्यानंतर काल झालेल्या सुनावणीमध्ये बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
तसेच आरोपी सज्ञान आहे की नाही ते पोलीस ठरवतील असे बालहक्क कोर्टाने म्हटले आहे.