दिल्ली, अहमदाबाद नंतर आता बंगलोरमध्ये देखील काही ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची
धमकी मिळाली आहे. इमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. बंगलोरमधील काही
पंचतारांकित हॉटेल्सना धमकी ईमेलद्वारे
देण्यात आली आहे. यानंतर हॉटेल प्रशासनाने
तात्काळ पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. ईमेलद्वारे आलेल्या अशा धमकीमुळे सगळीकडे
एकच खळबळ उडाली आहे.
काल रात्री हा ईमेल हॉटेलला आला होता. मात्र रात्रभर कर्मचाऱ्यांनी
इमेलच पहिले नाहीत. सकाळी ईमेल पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर
हॉटेल्स प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने ईमेल
आलेल्या हॉटेल्सची तपासणी केली. दरम्यान हा ईमेल कुठून आला याचा कसून तपास पोलिस
करत आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील
शाळा, हॉटेल्स आणि सरकारी कार्यालये या ठिकाणी बॉम्ब असल्याच्या धमकीचे
ईमेल आले होते. तसेच अहमदाबाद येथील काही मोठ्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या
धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले होते. सतत असे ईमेल येत असल्याने सुरक्षा यंत्रणा
देखील सतर्क झाल्या असून, याबद्दल सखोल तपास करण्यात येत आहे.