आयपीएलच्या १७ व्या हंगामात
काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना पार
पडला. या चुरशीच्या सामन्यात राजस्थानने बंगलोरचा पराभव केला आहे. या पराभवामुळे
बंगलोरच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशा संपल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सला
फायनलमध्ये जाण्यासाठी आता सनरायझर्स हैद्राबादबरोबर क्वालिफायर सामना खेळावा
लागणार आहे.
कालचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर
अहमदाबाद येथे खेळवला गेला. संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सुरु झाला. या
स्टेडिअमवर टॉस हा अत्यंत महत्वाचा असतो. संजूने हुशारी दाखवत पहिल्यांदा गोलंदाजी
करण्याचा निर्णय घेत अर्धा सामना या ठिकाणीच जिंकला. दरम्यान फलंदाजी करताना
बंगलोरच्या संघाने २० ओव्हर्समध्ये १७२ धावा केल्या. मात्र अखेर काही धावा कमी
झाल्याचा फटका बंगलोरला बसला आणि बंगलोरच्या फायनलचे तिकीट थोडक्यात चुकले. तसेच
सर्वात महत्वाचे म्हणजे हा सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिकने आपली निवृत्ती जाहीर
केली आहे.