राजा शुद्धोधन आणि राणी माया यांच्या पोटी राजकुमार सिद्धार्थ यांचा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला. सिद्धार्थ लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले म्हणून त्याच्या मावशी ने गौतमीने त्याचा सांभाळ केला. त्यामुळे पुढे त्याचे नाव गौतम असे झाले. मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे या दुःखाचे निवारण कसे करावे याच्या शोधार्थ ते आपल्या पत्नी आणि मुलाचा त्याग करून घराबाहेर पडले. भारतातील बोधगया येथील बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले तेव्हापासून त्यांना गौतम बुद्ध म्हणू लागले.
ही ज्ञानप्राप्ती त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाली. तसेच त्यांचे महानिर्वाण हे त्याच दिवशी झाले होते म्हणून वैशाख पौर्णिमेचे महत्त्व बुद्ध पौर्णिमा म्हणूनही जाणले जाते. बौद्ध धर्मियांबरोबर हिंदू धर्मात ही तिथी तितकीच महत्त्वाची मानली जाते भागवत पुराणानुसार बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार आहेत. दुःख निवारण्यासाठी बुद्धांनी सांगितलेले आठ मार्ग
यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहर, ध्यान, धारणा, समाधी.
बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बुद्ध अनुयायी येतात. प्रार्थना करतात. तेथे बौद्ध धर्म ग्रंथाचे अखंड वाचन आणि पठण केले जाते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बौद्ध जयंती दिल्ली येथे साजरी केली गेली. जगभरातल्या बराच देशांमध्ये बौद्ध लोक हा सण उत्साहाने साजरा करतात थायलंडमध्ये 95% पेक्षा जास्त लोकसंख्या बौद्ध धर्मीय लोकांची आहे.
गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ ध्यानी अध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते त्यांची शिक्षा शिकवण त्यांच्या शिष्याने “त्रिपटक” या ग्रंथात संकलन केली आहे इसवी सन पूर्व 483 मध्ये भारतातील उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे त्यांचे महानिर्वाण झाले होते तो दिवसही वैशाख पौर्णिमेचाच होता
पुष्पा गोटख़िंडीकर, नाशिक
सौजन्य -समिती संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत