सध्या दिल्लीत स्वाती मालिवाल यांच्याशी मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तनाचे प्रकरण गाजत आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल एकमेकेंवर आरोप-प्रत्यारोप करत हर्ट. दरम्यान मालिवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांचा पीए विभव कुमारला अटक केली आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी गुरुवारी स्वाती मालीवाल हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पालकांच्या चौकशीवर चिंता व्यक्त केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वृद्धांचा छळ करण्यासाठी पंतप्रधान मोदी एवढ्या खालच्या स्तराला गेले आहेत का असा सवाल केला.
केजरीवाल सरकारमधील मंत्री आतीशी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केले. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, “वृद्ध आणि आजारी पालकांचा छळ करण्याइतके आमचे पंतप्रधान खालच्या स्तराला गेले आहेत का? मला वाटत नाही की देशातील राजकारण कधीही इतके खालच्या पातळीवर गेले आहे. ”आतीशी यांनी यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्यावर देखील प्रकाश टाकला.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आठवड्याभरानंतर मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्यावर केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीचे नेतुत्व अतिरिक्त DCP (उत्तर) अंजिता चेप्याला या करणार आहेत.