आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी आज सांगितले की इतर परिस्थितीमध्ये एखाद्याला त्यांची राज्यसभेची जागा हवी असती तर ती त्यांनी स्वेच्छेने दिली असती मात्र आता “अब चाहे दुनिया की कोई भी शक्ती” अलग जाय में राजीनामा नही करूंगी” (कोणत्याही शक्तीने माझ्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला तरी मी देणार नाही).असे त्या ठामपणे म्हणाल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना मालीवाल यांनी ठामपणे सांगितले की त्या सर्वात तरुण महिला संसदपटू आहेत आणिआतापर्यंत त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी “इच्छा” दर्शविली नव्हती.
“इतर वेळेस मी सहजपणे माझी राज्यसभेची सीट कोणालाही दिली असती मात्र आता माझ्या चारित्र्याची हत्या केली जात आहे, त्यामुळे राजीनामा देणे सोडाच उलट मी अजून आदर्श संसदपटू बनण्याचा आता प्रयत्न करेन “असे त्या म्हणाल्या आहेत.
पक्षांचे काही सदस्य शक्तिशाली होत आहेत, हे तुम्हाला कधीच का जाणवले नाही, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, प्रत्येकाचा अहंकार वाढला आहे.
“मी 2006 पासून त्यांच्यासोबत आहे. त्या वेळी आम्ही काम करायचो तेव्हा खूप वेगळं वातावरण होतं. आमच्या प्रत्येकामध्ये ‘जोश’ होता. मी 7 वर्षे झोपडपट्टीत राहिले आहे. पण जेव्हा सत्ता येते तेव्हा अनेक गोष्टी येतात आणि सर्वात मोठी गोष्ट जी येते ती म्हणजे अहंकार हळूहळू आणि हळूहळू जेव्हा तुमच्या डोक्यावर घेतो तेव्हा तुम्हाला कदाचित खरे काय, खोटे काय, बरोबर ते दिसत नाही. ,
मी कधीच विचार केला नव्हता की एखाद्या मुलीला आधी मारहाण केली जाईल आणि नंतर तिला पूर्णपणे चारित्र्यहनन करून बदनाम केले जाईल, आणि दुर्दैवाने हे आता माझ्यासोबतच घडते आहे.”
या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला आम आदमी पक्षाचे (आप) सदस्य असलेल्या मालीवाल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती.
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या माजी सहाय्यकावर केलेल्या हल्ल्याच्या आरोपानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणाले की, या प्रकरणावर आप प्रमुखांचे मौन हे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्याबाबत त्यांची भूमिका दर्शवते.
दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि मालीवाल यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. बिभवला दिल्ली पोलिसांनी रविवारी १९ मे रोजी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.