Hardik Pandya – Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्याची इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सचे कर्णधार म्हणून हार्दिक बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये फ्लॉप ठरला. तसेच हार्दिकच्या नेतृत्वाखाली पाचवेळा चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स यंदाच्या 17 व्या हंगामात तळाशी राहिली. मुंबई इंडीयन्समधील खराब कामगिरीमुळे हार्दिक चर्चेत होता पण आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकमध्ये सध्या काहीही ठीक चालले नसल्याचं समजत आहे. तसेच कदाचित ते दोघे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकसोबत नताशाही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हार्दिकच्या आयपीएल कामगिरीवरून नताशाला ऑनलाइन धमकी देण्यात आली होती, त्यामुळे ती चर्चेत होती.
तसेच आता Reddit वर ‘नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत का?’, अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच कोणीतरी मंगळवारी Reddit वर पोस्ट केले की, “हा फक्त एक अंदाज आहे, पण दोघेही एकमेकांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत नाहीत. याआधी नताशाच्या इंस्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असे लिहिले होते, पण आता तिने हे आडनाव काढून टाकले आहे.”
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “4 मार्चला हार्दिकचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी हार्दिकने काहीही पोस्ट केले नव्हते. तसेच नताशाने स्वतःचे आणि हार्दिकचे काही अलीकडील फोटोही काढून टाकले आहेत. त्यामुळे हार्दिक आणि नताशा या दोघांमध्ये काहीही चांगले चालले नसल्याचं दिसत आहे.”
दरम्यान, 31 मे 2020 रोजी हार्दिक आणि नताशा यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. तर त्याच वर्षी 30 जुलै रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला होता.